fbpx
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पुणे Ration Card – देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशन कार्ड (Ration Card) तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. रेशन कार्ड (Ration Card) तयार करायचे असेल तर काही नियमात बदल केले आहेत. मात्र, आता नवीन रेशन कार्ड (Ration Card) काढायचे असेल तर जातीच्या प्रमाणपत्राची काहीही गरज नाही. प्राधान्य आणि अंत्योदय योजनेअंतर्गत अनुक्रमे २४ लाख ९१ हजार ८५१ आणि २ लाख १९ हजार ३०८ लाभार्थी आहेत. त्यांना सध्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळत आहे.

हे वाचा – राज्य आणि केंद्राचा वाद पेटणार; राज्यातील 5 ड्रग्ज केस NCB कडे वर्ग करण्याचे अमित शहांचे आदेश

               रेशन कार्ड (Ration Card) ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरता येते. रेशन कार्ड हा प्रत्येकाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. नवीन गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक खाते उघडणे, सिम कार्ड मिळवणे ते मतदार ओळखपत्रासाठी या रेशन कार्डचा वापर होत असतो. नव्या रेशन कार्डासाठी कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो, जुने रेशन कार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, कुटुंबप्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स, संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स, सदस्यांचा जन्माचा दाखला, उत्पन्नाच्या दाखला, लाइट बिल, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

* जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वस्त धान्य एकूण दुकाने – १८२३

* पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य एकूण दुकाने – ७२४

* जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण शिधापत्रिकाधारक – २७,११,१५९

* पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण शिधापत्रिकाधारक – १०,२६,०००

अंत्योदय योजना – ८,१७७

प्राधान्य कुटुंब – ३,२२,०००

                  रेशन कार्ड तयार करायचे असेल तर काही नियमांत बदल केले आहेत. मात्र, त्यामध्ये जातीचा दाखला जोडावा लागणार अशी काही अट टाकलेली नाही. त्यामुळे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला द्यावा लागणार यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update