Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सांगली- गतवर्षभरात जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये शिधापत्रिका मागणीसाठी प्राप्त झालेल्या 50 हजार 551 प्रस्तावांपैकी 49 हजार 914 शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. महसूल विभागाने ही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी या विभागाच्या कामाचा गौरव केला. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने वितरित न केलेल्या 637 शिधापत्रिकाही त्रुटी दूर होताच वितरित करण्यात येतील. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची तालुका निहाय माहिती पुढीलप्रमाणे अटपाडी तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 4384, वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 4384, जत तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 2742, वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 2696, कडेगाव तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 2013, वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 2013, कवठेमहाकांळ तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 2360, वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 2360, खानापूर-विटा तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 2468, वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 2468, मिरज तालुका- प्राप्त प्रस्तावांची संख्या – 2577 वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 2419, पलूस तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 5044 वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 4934, सांगली शहर – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 6915 वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 6592, शिराळा तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 3175 वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 3175, तासगाव तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 9967 वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 9967, वाळवा तालुका – प्राप्त प्रस्तावांची संख्या – 8906 वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या – 8906 .
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143