Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
सोलापूर Ration- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील शिधा धारकांना1 महिना पूर्वी दिवाळी गिफ्ट म्हणून 100 रुपयात साखर, रवा, तेल व तुरदाळ असे इतर प्रत्येकी एक किलो देण्याची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरात रेशन दुकानांमध्ये दिवाळी निमित्त अर्धवट आनंदाचे शिधा किटचे वाटप करण्यात आले.
भवानी पेठेतील ब 51 या दुकानांमध्ये रेशन कार्ड धारकांना प्रभाग क्रमांकन 3 चे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या हस्ते दिवाळी आनंदाची शिधा किटचे वाटप करण्यात आले. यंदाची दिवाळी गोर गरिबांना गोड व्हावी यासाठी शिंदे सरकार व भाजप सरकार प्रयत्नशील आहे. परंतु काही दुकानात अर्धवट किट वितरित झाल्याने नागरिक अद्याप किट व धान्यापासून वंचित आहे. दिवाळी किट वाटप करताना कुठे गैरकृत्य झाल्यास किंवा नागरिकांना धान्य आणि किट दिवाली पर्यंत न दिल्यास आम्ही जन आंदोलन करू असा पवित्रा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी घेतला आहे.
काही Ration रेशन दुकान धारक व पदाधिकारी यांनाच धान्य आणि किट मिळाले आहे असे न होता सर्व रेशन दुकान धारकांना धान्य आणि किट मिळाले पाहिजे आणि दिवाली पर्यंत पुर्ण किट वाटप न झाल्याने नागरीकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे इशारा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी केले आहे. काही रेशन दुकान धारकांना एक वस्तू तर काही रेशन दुकान धारकांना दोन वस्तू असे भेटत आहे असे न होता सर्व रेशन दुकान दारकंना धान्य आणि दिवाली आनंदाची शिधा किट मिळाले पाहिजे. या रेशन दुकान धारकांना पुर्ण धान्य आणि दिवाली आनंदाची शिधा किट न दिलेल्या अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावे असेही माजी सभागृह नेता सुरेश पाटील म्हणाले
याप्रसंगी दत्तात्रय बडगु , शेखर इगे, नितीन चीलवेरी , प्रशांत इटकल, महेश मंगळपल्ली, भास्कर यल्लाराम , अविनाश ढाकणे , राम मलजी , लक्ष्मीनारायण बिज्जा , अनील वड्डेपल्ली, किशोर दासरी , नवीन गोटीमुक्कुल , लींगराज पाटील, अक्षय पाटील, विज्जू कोळी आदी रेशन कार्ड धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143