Food Health

रेशनच्या दुकानात मिळणारे धान्य निकृष्ठ दर्जाचे..

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आमदार संजय केळकर यांनी घेतली तात्काळ दखल.
ठाणे – ठाण्यातील विविध ठिकाणी शिधावाटप दुकानात दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना मिळणारे तांदूळ व गहू हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याबाबतची लेखी तक्रार नगरसेविका सौ. नंदा पाटील यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. ठाण्यातील ३६ फ दुकान नंबर १५४ गोकुळनगर, ३६ फ / २१९ शीतल डेअरी, ३६ फ / ३९ खोपट, ३६ फ / १२९, ३६ फ / ४५ मसानपाडा कॅशरमिल, ३६ फ / १३३ कोलबाड आदी विविध ठिकाणावरील शिधावाटप दुकानात अति निकृष्ठ दर्जाचे तांदूळ व गहू मिळत असल्याबाबत तक्रार होती. आ. केळकर यांनी तात्काळ याबाबत ठाण्याचे शहराचे शिधावाटप अधिकारी श्री. पळसकर यांना सदर दुकानातील तांदूळ व गहू याचे नमुने तपासण्याच्या सूचना दिल्या असता तांदूळ व गहू अत्यंत निकृष्ठ दर्जाचे दिसून आले. आ. केळकर यांनी या विषयी शिधावाटप अधिकाऱ्यांना असे निकृष्ठ दर्जाचे तांदूळ व गहू नागरिकांना न देण्याच्या सूचना करून नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य देण्यात यावे असे सांगून याबाबत संताप व्यक्त केला. त्याप्रमाणे ३६ फ चे शिधावाटप अधिकारी यांनी संबंधित तसेच इतर ठिकाणी असलेल्या शिधावाटप दुकानदारांना तात्काळ असे तांदूळ व गहू न देण्याच्या सूचना केल्या असून असे धान्य बदलण्याचे निर्देश ही अधिकाऱयांनी दिले असल्याची माहिती आ. केळकर यांनी बोलताना दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143