fbpx
re-examination-academic

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई Exam –  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी २०२२ या परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लगेच पुनर्परीक्षा घ्यावी याबाबत काही विद्यार्थ्यांची, संस्थांची तसेच संघटनांची निवेदने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळास प्राप्त झालेली आहेत. त्या अनुषंगाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता संबंधित विषयांचे योग्य आकलन होण्याच्या दृष्टीने उपचारात्मक अध्यापन संस्थास्तरावर घेण्याबाबत सर्व संस्थांना निर्देशित करण्यात येईल.

आयुर्वेदातील संशोधनाद्वारे मानवजातीचे कल्याण साधता येईल

             Exam तसेच, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थातील अंतिम सत्र/वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास्तव उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत अंतिम सत्र/वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता केवळ अनुत्तीर्ण असलेल्या विषयांकरीता एक विशेष बाब म्हणून सप्टेंबर २०२२ या महिन्याच्या तिसऱ्या /चौथ्या आठवड्यापासून प्रचलित पध्दतीने फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

राज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या परिक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या स्वायत्त मंडळाव्दारे आयोजित केल्या जातात. Exam कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२०, हिवाळी परीक्षा २०२०. उन्हाळी परीक्षा २०२१ व हिवाळी परीक्षा २०२१ या चार परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या होत्या. तद्नंतर प्रथमच उन्हाळी २०२२ ही परीक्षा प्रचलित  पध्दतीने घेण्यात आली व त्याचा निकाल २९ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने विशेष बाब म्हणून विद्यार्थ्याकरीता एक अधिकची संधी देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी निवदनाद्वारे सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update