Economy Solapur City

सर्व क्षेत्रांसाठी दिलासादायक बजेट: आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर (प्रतिनिधी)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले आजचे बजेट हे सर्व क्षेत्रातील लोकांसाठी दिलासादायक असे आहे. यामध्ये शेतकरी आणि तरुणांचा प्रामुख्याने विचार केला आहे. याशिवाय जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे आ. सुभाष देशमुख बजेटबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देऊन दिलासा दिला आहे. तसेच सरकारी बँकांना 20 हजार कोटीचे अर्थसाहाय्य देऊन तरुणांसाठी उद्योगधंद्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तरुणांना रोजगार मिळवा म्हणून 7 टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून देशात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची उभारणी करण्यात येणार आहे. शिवाय कोव्हिड लसीकरणासाठीही सुमारे 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीही मोठा निधी देण्यात आला आहे. 100 जिल्हात सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन राबवण्यात येणार आहे. याशिवाय गॅस पाईपलाईनचा विस्तारही करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे, असे आ. देशमुख म्हणाले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143