Maharashtra

धक्कादायक! या शहरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही

मुंबई- अनेक राज्यांनी 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं मोफत कोरोना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही सध्या याबाबत विचार सुरू आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य सरकार मोफत कोरोना लस देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून अशात मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत मात्र मोठा निर्णय घेतला आहे. 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 1 मे पासून कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळेल. खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना त्याचे पैसे द्यावे लागतील आणि आता मुंबई महापालिकेने 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना खासगी रुग्णालयातच लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना फक्त खासगी रुग्णालयात लस मिळेल, असं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. मुंबईत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही, हे BMC ने स्पष्ट केलं आहे.

हे वाचा – Big Breaking news
मुंबईत हॉस्पिटलमध्ये आगीचं सत्र सुरूच; चार रुग्णांचा मृत्यू
https://solapurcitynews.com/mumbai-hospital-fire-continues/

           महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं, 18 ते 45 वयोगटातील मुंबईत जवळपास 9 दशलक्ष नागरिक आहेत. त्यांचं लसीकरण करण्यासाठी जवळपास 1.80 कोटी लशीच्या डोसची गरज आहे. लसीकरण मोहिमेची व्याप्ती, लशीचा पुरेशा साठा, मागणी, वाहतूक आणि पुरवठा आणि लसीकरण केंद्र या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबत सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणाची पुढची दिशा ठरेल. 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना महापालिका आणि सरकारी केंद्रात लस दिली जाईल. पण 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मुंबईतील खासगी रुग्णालयातच लस घेता येईल, असं चहल यांनी सांगितलं. कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं चहल म्हणाले. खासगी रुग्णालयात लस म्हणजे या नागरिकांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार.

                 सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्डची किंमत राज्य सरकारसाठी प्रति डोस  400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये आहे. जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस आपली असल्याचं सीरमने सांगितलं आहे. तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये आहे. पण ही किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे ही किंमत आणखी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. लस उत्पादक कंपन्यांना लशीची किंमत कमी करण्याची विनंती केंद्राने केली आहे.

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com