Solapur City News 62
Economy Solapur City

समाजाची गरज ओळखून उपक्रम राबविण्याची ब्रम्हदेवदादांची परंपरा आजही ठेवली कायम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापुर- ब्रह्मदेवदादांची सामाजिक कार्याची परंपरा, समाजाप्रती त्यांची असलेली तळमळ त्यांच्यानंतरही समाजोपयोगी उपक्रम घेऊन त्यांचे माने कुटुंबिय साजरे करीत आहेत. ही संस्था रक्तदान शिबीर ही काळाची गरज ओळखून समाजोपयोगी कार्य करीत आहे, असे सोलापूर महानगरपालिकेचे उप-आयुक्त त्र्यंबक
डेंगळे-पाटील म्हटले. कै .सौ. मातोश्री सुमित्राबाई माने यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त कुमठे शिक्षण संकुलात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सिव्हील हाॅस्पीटल रक्तपेढीने रक्तदात्यांचे संकलन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा स्मार्ट सीटी सोलापुरचे सिईओ डेंगळे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी उप-आयुक्त डेंगळे-पाटील यांनीही रक्तदान केले. याप्रसंगी मजरेवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूंधती हराळकर, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांची प्रमुख अथिती म्हणून उपस्थिती होती. रक्तदान शिबीर आयोजनामागील भूमिका विषद करताना आज ग्रामिण व शहरी भागातील गोरगरीब रुग्ण सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. त्यांना खऱ्या अर्थांने रक्ताची गरज भासत असून ती गरज ओळखूनच बाईसाहेबांचा स्मृतिदीन रक्तदान शिबीराने साजरा केल्यास समाजोपयोगी ठरेल, म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आल्याचे संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनी प्रास्ताविकात सांगितले. या रक्तदान शिबीराला एसपीएम पाॅलीटेक्निकच्या प्राचार्या रोहिणी चव्हाण, कुमठे माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, उपमुख्याध्यापक प्रकाश काशीद,पर्यवेक्षक मलकारी कोरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक दिनेश बिराजदार , भैय्यासाहेब वळसंगकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत लिंबीतोटे, रसुल शेख, तानाजी ताकमोगे, अजित माने, राहुल आवताडे, विठ्ठल म्हेत्रे, बाबा सिंघन, महादेव कोळी, प्रशांत व्हरडे यांच्यासह कुमठे संकुलातील विविध विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा लोंढे यांनी केले तर दिनेश बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
……………. : चौकट : ……………
लोकांचा मनातील भिती दूर करुन
कोविडशी लढू : डॉ. हराळकर
कोविड लसीकरणाबाबतची लोकांच्या मनातील भिती गैरसमज दूर करुन जागतिक महामारी कोविडशी लढून आपले देश, राज्य, शहर, गांव. आरोग्य संपन्न करु, असे मत डॉ. अरुंधती हराळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
……………. : फोटो : ……………
छायाचित्रात जयकुमार माने, रक्तदान करताना मनपा उप-आयुक्त त्र्यंबक डेंगळे-पाटील, डॉ. अरुंधती हराळकर, विनोद कुलकर्णी, प्रकाश काशीद आणि अन्य दिसत आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143