Job Maharashtra

पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीयांची पदे भरावित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीयांची 50 टक्के पदे कपात करण्यात आली होती. ही पदे भरण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, असे निवेदन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले व याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. याबाबतचे निवेदन पालकमंत्री शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले असल्याचे ॲङ ठाकूर यांनी सांगितले. या मागणीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून पाठपुरावा होत आहे. या अनुषंगाने त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. ग्रामविकास मंत्री  मुश्रीफ यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाकडून मागासवर्गीयांची पदे भरण्याबाबत आवश्यक अहवाल व प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मागासवर्गीयांची 50 टक्के कपात करण्यात आलेली शिक्षक पदे भरती करण्यात यावीत. याबाबत डी.टी. एड., बी.एड. स्टुडंट असोशिएशनच्या अमरावती जिल्हाध्यक्षांकडून निवेदनही प्राप्त झाले आहे. शालेय शिक्षण विभागातील संबंधितांना आदेश व्हावेत व मागासवर्गीयांची कपात केलेली शिक्षक पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143