register-orchards-hortinet
Food Solapur City

फळबागांची हॉर्टीनेटद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- किटकनाशक उर्वरित अंश व किड रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टीनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते, सन 2020-21 मध्ये सोलापूर जिल्ह्यातुन 1486 हेक्टर क्षेत्रावर 2049 फळबाग व भाजीपाला प्लॉटची नोंदणी झालेली आहे. सन 2021-22 करिता निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे.
 
            जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की सन 2021-22 करिता नोंदणी / नुतनीकरण करीता कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्वरित विहित नमुन्यातील अर्ज,7/12 उतारा,8 अ उतारा, बागेचा नकाशा, व आवश्यक नोंदणी फी (फक्त द्राक्ष पिकासाठी) अर्ज करावेत व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे, यांनी केले आहे.

हे वाचासोलापूर जिल्ह्यातील दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरू

नोंदणी करण्याची मुदत खालील प्रमाणे
 
            ग्रेपनेट, पिक- द्राक्ष,-ऑक्टोबर 2021 ते नोव्हेंबर 2021 -50/-रूपये प्रति 1.20 हेक्टर क्षेत्राकरीता /  द्राक्ष लेट फी- नोंव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021-100/- रु प्रति 1.20 हेक्टर क्षेत्राकरीता. मँगोनेट- आंबा- डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022- फी आवश्यकता नाही. अनारनेट-डाळिंब-ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022- फी आवश्यकता नाही. व्हेजनेट-भाजीपाला-वर्षभर सुरु परंतु काढणीच्या अगोदर  15 दिवस आवशयक – फी आवश्यकता नाही. सिट्रसनेट-लिंबुवर्गीय-वर्षभर सुरु परंतु काढणीच्या अगोदर 15 दिवस आवश्यक- फी आवश्यकता नाही.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews