rehabilitated-villages-melghat
Economy Maharashtra

मेळघाटातील पुनर्वसित गावांच्या अडचणी सोडवा – बच्चू कडू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिक्षेत्रातून पिली, मांगिया, रोला, वन मारुल, चुरणी आदी गावांचे चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतू, पुनर्वसित गावांत नागरी सुविधांचा अभाव असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. रस्ते, नाल्या, शाळा, समाज मंदीराचे बांधकाम संदर्भात तेथील नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वन विभागाने पुनर्वसित गावांच्या संदर्भात योग्य नियोजन करुन संबंधित गावकऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उभारण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे असे निर्देश जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार व महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, वन विभागाचे अधिकारी, तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते.

हे वाचा- निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृह बांधकामाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा

कडू म्हणाले की, वनांच्या सानिध्यात उदरनिर्वाह करणाऱ्या गावकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता पुनर्वसित गावांत मनरेगा योजनेच्या माध्यमातून सर्व सुविधा उभारणी करण्यात याव्यात. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात येणार असून येत्या दोन ते तीन महिन्यात त्याठिकाणी सुविधांची उभारणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ते पुढे म्हणाले की, आदिवासी विकास विभागाने शबरी व ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ मिळवून द्यावा. कोरोना संकटकाळात आदिवासी मुलांचे शिक्षण खंडीत पडले आहे, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा बांधकाम पूर्ण होईपर्यंत तीन किलोमीटरच्या शाळेत शिक्षण घेता येईल यासाठी आदिवासी विकास विभागाने व्यवस्था करावी. वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत पुनर्वसित गावात शिबिराचे आयोजन करुन मतदान ओळखपत्र, जातीचे दाखले आदी कागदपत्रे गावकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावे, असेही निर्देश कडू यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143