Health

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे.

               भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील पटेल कंपाऊंड मधील जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या कायदेशीर वारसांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये तीन लाख देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १ कोटी १४ चौदा लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबंधित ३८ मृतांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून वितरीत होणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com