fbpx
Religion

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.पिंपरी चिंचवड येथे लिंगायत समन्वय समितीच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय

पिंपरी चिंचवड Religion – लिंगायत धर्माची संविधानिक मान्यता रद्द झाल्याने लिंगायत धर्म बांधवांना धार्मिक अल्पसंख्याकांच्या कोणत्याही सवलती आणि हक्क मिळत नाहीत. त्यामुळे लिंगायत धर्माला संविधानिक मिळण्यासाठी आणि राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी सोमवार 07 नोंव्हेबर रोजी मुबंईत केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात येथे राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा होणार आहे. अशी घोषणा अखिल भारतीय लिंगायत समन्वय राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर यांनी केली आहे.

   Religion    पिंपरी चिंचवड येथील भोसरी परिसरातील शिवयोगी भवन येथे पार पडलेल्या बैठकीत सर्व संघटनांच्या उपस्थित निर्णय घेण्यात आला. प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरुवात झाली. या बैठकीस लिंगायत समन्वय समितीचे राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे सोलापूर, वीरेंद्र मंगलगिरी औरंगाबाद, प्रा. राजेश विभुते, प्रा. सुनील हेंगणे,प्रा.उद्धव तवडे, जि. प. सदस्य महेश पाटील लातूर, महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब होनराव पुणे, लिंगायत धर्म महासभा प्रदेशाध्यक्ष बी. एस. पाटील, प्रदेश सचिव देशिंगे कोल्हापूर, जागतिक लिंगायत महासभेचे संतोष फताटे मुंबई, बसव प्रतिष्ठान पुणे चे संजय इंडे, संतोष माळ शेट्टी, रवी खुबा, शिवयोगी भवनचे शिवयोगी ढवळेश्वर पिंपरी चिंचवड,नांदेड बसव ब्रिगेडचे आनंद कर्णे, सचिन पेठकर, बसव ब्रिगेड आंबेजोगाई चे विनोद पोखरकर, ज्येष्ठ विधिज्ञ बी. आर. हंद्राळे, राष्ट्रीय बसव दल पुण्याचे सतीशकुमार पाटील, मल्लिकार्जुन तगारे, उदगीर चे किशोर पाटील, सोलापूर बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सागर पाटील योगेश स्वामी आदी विविध संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या Religion 
1) लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी
2) राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा जाहीर करावा
3)बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
4) मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. अश्या विविध मागण्यांसाठी लिंगायत महामोर्चा निघणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्यभरात लवकरच प्रत्येक जिल्ह्यात विविध संघटना, संस्था, मठ, मंदिरे, समाजबांधवांची बैठक घेणार असल्याची माहिती राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद कर्णे तर आभार प्रदर्शन वीरेंद्र मंगलगिरी यांनी मानले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update