Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Religious – भवानी पेठ येथील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी बसलिंगप्पा करली तर उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कोळी संतोष करली यांची निवड करण्यात आले. शनिवारी सायंकाळी अथर्व गार्डन येथे पार पडलेल्या वार्षिक मिटिंग मध्ये पदाधिकारी जाहीर करण्यात आले. 26 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत असून गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे संकट दूर झाल्याने शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.
Religious दरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र उत्सव साजरा करण्या संदर्भात व नवरात्र महोत्सवाच्या सन 2022-23 उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी यांचे निवड करण्यासंदर्भात अथर्व गार्डन येथे संस्थेचे आधारस्तंभ माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Religious या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सिद्राम तेगेळ्ळी हे होते तर सिद्रामय्या पुराणिक, ट्रस्टी सिद्धाराम कलशेट्टी, निंगाप्पा पुजारी अशोक जेनुरे, नरसप्पा मंदकल, चनवीर चिट्टे, अशोक कटके, बंडप्पा डोळ्ळे, दशरथ गंजेळी, सिद्धाराम करली आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जेमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी बसलिंगप्पा उर्फ मुदका करली, उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कोळी व संतोष करली यांची निवड करण्यात आले. खजिनदारपदी नागराज टिंगी, सह खजिनदार रेवन वगूर, सेक्रेटरी सिद्राम मंदकल, सह सेक्रेटरी लिंगराज मासरेड्डी, कार्याध्यक्ष नितीन शेजुळ, लेझीम प्रमुख कैलास इचगे, मिरवणूक प्रमुख पवन तगारे, चंद्रकांत कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आले. दरम्यान यावेळी नूतन पदाधिकारी यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
26 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शक्ती देवीची नवरात्रोत्सवातील आराधना व जागर करता आला नव्हता. Religious परंतु यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात व शांततेत उत्सव साजरा करावे असे मनोगत यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. तसेचयावेळी चन्नवीर चिट्टे, अशोक कटके आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्राम तेगेळ्ळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान अथर्व गार्डन येथील या बैठकीस भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील शक्ती देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष विकी जाटगल, विनायक पाटील, नागेश कोळी, सूरज हलसूरे, सूरेश मंदकल, शिवपुत्र मंदकल, यल्लप्पा करली, विजय कोळी, रवी मंदकल, नवीन गोटीमुकुल, व बिपिन पाटील मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले. या बैठकीचे सुत्रसंचलन मल्लिकार्जुन चोपडे यांनी केले तर आभार बिपिन पाटील यांनी व्यक्त केले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143