fbpx
Religious opinions-of-peoples

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Religious –  क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ व  मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या सूचना, मते विचारत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

                 Religious  जिल्हा नियोजन भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामाबाबत आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते.  बैठकीला खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह वारकरी संस्थानचे विश्वस्त, महाराज मंडळी, पंढरपूर येथील स्थानिक व्यापारी, नागरिक उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे ऑनलाईन उपस्थित होते.
                    यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या  प्रमाणात भाविक येत असतात. Religious त्याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार प्रमुख यात्रा भरतात.  पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे.  यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे.   यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी यांनी लेखी सूचना आठवडाभरात द्याव्यात, याचाही विचार करण्यात येणार आहे.
                       आषाढी यात्रा कालावधीत पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. पालखी तळावर वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.   Religious परंतु काही ठिकाणी पालखी तळ अपुरे पडत असल्याने पालखी तळांचा देखील विस्तार करण्याबाबत या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालखी सोहळा प्रमुख, महाराज मंडळी यांच्या सूचनांही जाणून घेतल्या जातील. तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरातील विद्युत रोहित्रे एकाच ठिकाणी एकत्र बसविण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदीवरील नवीन घाट निर्मिती प्रस्तावित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Corona Live Update