Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापुर Rent – घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट जुने वाहन विक्री – खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांनी जिल्ह्यात नव्याने भाड्याने राहण्यास येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.
Rent देशात,राज्यात व महत्वाच्या शहरात दहशतवादी कारवायात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे स्थानिक लोकांत मिसळून तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करून घातपाती कारवायांना अंतिमरूप देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी व मालमत्तेचे नुकसान होत असून त्याचबरोबर अशा घटनांमुळे जनमाणसांमध्ये घबराटीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. सदर दहशतवादी कारवायामध्ये जुनी चारचाकी व दुचाकी वाहने तसेच इतर वस्तु वापरतात तसेच सदर कारवाया वेळी ते भाड्याने रूम, प्लॉट, लॉज घेवून राहतात. तसेच मस्जिद, चर्च, धर्मशाळा, येथे आश्रय घेतात किंवा सदरची जागा विकत किंवा लिजने घेतात. यासाठी ते स्थानिक ओळख म्हणून प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंन्ट जुने वाहन विक्री- खरेदी करणारे दुकानदार यांची मदत घेतात.
जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणारे व्यक्ती यांची माहिती असणे आवश्यक असून अशी माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे गरजचे आहे. Rent जेणेकरुन भविष्यात होणाऱ्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होऊ शकतो. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आबाधित राहण्यास मदत होईल आणि लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता अबाधित राहील .
यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर , ब्रोकर, एजंन्ट जुने वाहन विक्री – खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही अनोळखी नवीन राहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जी – जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस स्टेशनला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलीसांना माहिती न देता उपलब्ध करून देणे. Rent
तसेच नवीन, जुने वाहन घेण्यास येणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्या संबंधीची संपूर्ण माहिती, तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पेालीस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना पोलीसांना माहिती न देता जुने वाहन खरेदी – विक्री व भाड्याने उपलब्ध करुन देण्यास कलम 144 अन्वये बंदी असून हे आदेश दिनांक 21 ऑक्टोबर ते 19 डिसेंबर 2022 या कालावधीत सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण हद्दीत ( पोलीस आयुक्तालय हद्द वगळून ) सर्व नगरपालिका हद्दीत लागू असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी आदेशात नमूद केले आहे. Rent
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143