fbpx
Report damage public property

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सातारा Report –  जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहित धरुन सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा

Report  जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. त्यावेळी देसाई बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचेसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

1 310 Report : सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करावेत

              यावेळी देसाई म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे, शेतजमिनीचे नुकसान, घर पडझडीचे नुकसान,  पशुधनाचे नुकसान यासर्व बाबींचा मागील आठवड्यातील व पुढील तीन-चार दिवसांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान होईल त्याचा संबंधित विभागाने नुकसान भरपाईचा एकत्रित अहवाल लवकरात लवकर सादर करावा, म्हणजे निधीची तात्काळ तरतूद करता येईल. Report  ज्या पाझर तलावांचे नुकसान झाले आहे त्याचाही अहवाल सादर करावा. तसेच जे निकषात बसत नाही, परंतू नुकसान झाले आहे असा प्रस्तावही विशेष बाब म्हणून सादर करावा. Report रस्ते, वीज, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासारख्या व अन्य सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचे परिपूर्ण प्रस्तावही सादर करण्यात यावेत. ज्या कुटूंबांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्यांना प्रशासनाने तातडीची मदत देण्याची व्यवस्था करावी.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update