3WEB 20HUMANI
शेतकरी

बोंडसड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन गरजेचे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारख्या रोगांमुळे अनेकदा अडचणीत येतो. या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे यांनी विशेष लक्ष देऊन संशोधन करावे, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या. विधानभवनात कापूस बियाण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.

                    विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले, मराठवाडा, विदर्भ या भागात कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापसावर गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारखे रोग पडल्यास शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे भौगोलिक परिस्थिती आणि हवामान आधारित कापूस पीकपद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठाने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन करावे व विशिष्ट कालमर्यादेत उपाययोजना सुचवाव्यात. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. बियाण्यांच्या तक्रारीसंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही पटोले यांनी यावेळी दिले. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती इतर राज्यांपेक्षा पोषक असून अन्नदाता शेतकरी समृद्ध होण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विद्यापीठांनी नवनवीन हवामान आधारित पीक पद्धती विकसित कराव्यात, असेही पटोले यांनी सांगितले.

                     यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी विभागाचे सह सचिव गणेश पाटील, कृषी संचालक दिलीप झेंडे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले, तसेच प्रा.सुशिला मोराळे, देवानंद पवार, संजय लाखे, बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषी संशोधक, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.     

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com