Fund

जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणासाठी ३ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- आगामी आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणाकरिता ३ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी याबाबत आग्रह धरला होता. महिला व बाल कल्याणाकरिता जिल्हा स्तरावर सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ चे वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीचे प्रमाण किती असावे याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिला व बाल कल्याणाकरिता चिन्हांकित निधीबाबतही (इव्हॅल्युएटेड फन्ड्स फॉर वुमन ॲण्ड चाईल्ड वेल्फेअर) सुचनांचा समावेश आहे.

महिला व बाल कल्याणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ पासून महिला व बाल कल्याणाकरिता काही अतिरिक्त जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येणार आहेत. त्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ मध्ये महिला व बाल कल्याणाकरिता ३ टक्के निधी राखीव म्हणून उपलब्ध करावयाचा आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com