response-blood-donation-camp
Solapur City

Blood donation : भवानी पेठ येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

एकूण 276 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

सोलापूर Blood donation – महाराष्ट्राचे आराध्य दैवत लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शहरात ठिकठिकाणी अपार उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट झुगारून शिवप्रेमींनी शिवरायांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले. दरम्यान घोंगडे वस्ती भवानी पेठ परिसरातील जय भवानी प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष हिंदूश्री संदीप महाले यांनी सामाजिक बांधिलकीतून, काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

प्रभागाचा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची धमक फक्त आणि फक्त सुरेश पाटलांमध्ये- शशिकांत थोरात

            या रक्तदान Blood donation शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे, भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, दैनिक तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे, शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, युवा नेते बिपिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ताकभाते, चन्नवीर चिटे, संजय होमकर, अक्षय अंजीखाने, गोपाळ कोडम, किरण वल्लाल, संजय साळुंखे आदींच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व शिव आरतीने करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांनी केले. या रक्तदान शिबिरास युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत 276 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान ही काळाची गरज ओळखून संदीप महाले यांनी हा उपक्रम हाती घेतल्याने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी महाले यांचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकीतून आपणही समाजाचे काहीतरी देणं असतं याच भावनेतुन काळाची गरज ओळखून सर्वत्र कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी संदीप महाले यांनी सांगितले. या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन महात्मा बसवेश्वर रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जय भवानी प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

response-blood-donation-camp

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com