Vijaykumar deshmukh solapur
Election Maharashtra

शेळगी येथे मतदार नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

भाजपा शहर उत्तर आणि युवा मोर्चाचा उपक्रम
सोलापूर- प्रभाग क्रमांक दोन शेळगी मित्र नगर येथे भारतीय जनता पक्ष शहर उत्तर आणि भारतीय जनता युवा मोर्चा सोलापुर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने “मी मतदार लोकप्रतिनिधीचा आधार” या हेतूने नव मतदार (election) नोंदणी आणि युवा मोर्चा सदस्य नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Vijaykumar deshmukh
मित्र नगर, कुमारस्वामी नगर, मेहताब नगर, बसवेश्वर नगर, संतोषी माता नगर ,रामराज्य नगर, शिवगंगा नगर, सन्मित्र नगर, शेळगी भागात भाजपा शहर उत्तर आणि युवा मोर्चाच्या वतीने नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक किरण देशमुख, प्रा. नारायण बनसोडे, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, बसवराज इटकले, मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी सुधाकर नराल , शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, अभियान प्रमुख गणेश साखरे, सुजित चौगुले प्रशांत गायकवाड आदींची उपस्थिती होती. संपूर्ण शहर उत्तर मतदारसंघात या अभियानास प्रतिसाद मिळत असून कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे नव मतदार नाव नोंदणी यासह युवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियानास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे मत नगरसेवक नारायण बनसोडेआणि सोमनाथ रगबले यांनी यावेळी सांगितले.
Viया उपक्रमास कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत गायकवाड, सुनील ढोणे, संतोष बंडगर, महेश जळकोटे , सागर माने, आकश बेल्याळ, विजय कुलथे, प्रतीक आडम, सिद्धू भीमदे आदींनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com