Environment

तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते सायकल स्वारासाठी विश्रांती ठिकाणचे उदघाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – सोलापूर सायकल फौंडेशन आयोजित सोलापूर सायकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सारंग तारे व कार्याध्यक्ष भाऊराव भोसलेयांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ते तुळजापूर (परतीचा प्रवास) १०० किमी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पहाटे 5:30 मिनिटांनी सात रस्ता येथुन सायकल रॅलीस सुरुवात झाली. सायकल रॅली मधला मारुती तुळजापूर नाका मार्गे तुळजापूर शहर बायपास रस्ता मार्गे परत सोलापूर रस्त्यावरील काका का ढाबा येथे मा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या हस्ते विश्रांती फलकाचे उदघाटन काका का ढाबा या ठिकणी करण्यात आले.
                       सदर मार्गावरून 2019 साली जाणाऱ्या विदेशी सायकल पर्यटकांना गावगुंडा कडून त्रास दिला गेला होता, त्यावेळी सोलापूर सायकल क्लब चे सदस्य डॉ. चंद्रकांत क्षीरसागर यांनी त्या पर्यटकांना मदत केली होती, या घडनेचा विचार करून सायकलिस्ट फाऊंडेशन, सोलापूर व काका का ढाबा, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित विश्रांती ठीकाण चे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी काका का ढाबा चे व्यवस्थापक सुमेध पाठक हे सदर कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित होते. सोलापूर – तुळजापूर रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही सायकलस्वारासाठी काका का ढाबा या ठिकाणी सुरक्षित विश्रांती ठिकाण केलेले असून या ठिकाणी सर्व सायकलिस्ट ना मोफत हवा भरण्याची सोय, विश्रांती साठी एक बेड व पिण्याचे आणि वापराचे पाणी मिळेल. यावेळी सायकलिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष सारंग तारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना छोटी सायकल प्रतिकृती भेट देवून शुभेच्छा देण्यात आले.
         या रॅली मध्ये  सारंग तारे सर,भाऊराव भोसले सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मा. धनराज पांडे साहेब, अभियंता श्री तपन डंके, पोलीस निरीक्षक श्री नितिन पवार साहेब, रजनीकांत जाधव ,शितल कोठारी, नितीन चपळगावकर ,संजीवकुमार कलशेट्टी, मास्टर देवांश क्षीरसागर, मास्टर यश,  अभिनय भावठाणकर, विष्णू गाढे, सहा. लेखाधिकारी, प्रा. महेश देशपांडे, इत्यादी यांनी सहभाग घेतला. सायकल रॅलीचा समारोप रुपाभवानी मंदिर येथे करण्यात आला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143