State Min Aditi Tatkare Meeting 1 750x375 1
Maharashtra

अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी बाबत आढावा बैठक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- अलिबाग येथे स्थापन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, ‘आरसीएफ’च्या महाव्यवस्थापक श्रीमती सुनीता शुक्ला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, सा.बां. कोकण विभागाचे मुख्य अभियंता श्री.इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

           यावेळी राज्यमंत्री कु.तटकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सोयी-सुविधांचा विचार करून वास्तू मांडणी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. संचालक डॉ.लहाने यांनी महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष जागेचा पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com