

ठाणे – ठाणे खाडीत कंबरभर चिखलात रुतून बसलेल्या एका 20 वर्षीय मुलाला ठाणे महापालिकेचे कर्मचारी भरत मोरे यांनी जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले. या मुलाला कोपरी पोलीसाकडे सुपूर्द केलं आहे.ठाणे पूर्व येथील भरत मोरे हा महापालिकेचा कर्मचारी खाडी किनार वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.अनेक झाडे त्यांनी लावले असून ते जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसेच खाडी किनारी जखमी अवस्थेत पडलेल्या पक्षी,प्राण्यांचे जीव वाचवण्याचे काम ते करतात. आता खाडीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणाचा आपल्या जीवाची परवा न करता प्राण वाचवल्या बद्दल भरत मोरे यांचे कौतुक होत आहे.या मुलाला पोलिसांकडे दिले आता याठिकाणी देखील पोलिसांतील माणूस दिसून आला कोपरी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषराजे पाठणे यांनी सहकार्य करून विचारपूस करून या मुलाला खायला दिले. वर त्याला 300/-रुपये दिले.पोलीस या मुलाबाबत अधिक तपास करत आहेत .