Fund Solapur City

महापौरांच्या हस्ते प्रभाग क्र ९ मध्ये रास्ता शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्तेकामांचा शुभारंभ महापालिकेच्या विशेष रस्ते अनुदानातून करण्यात आला आहे. सोलापूरच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे हे फलित आहे. विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र असून यासाठी सोलापूरातील नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापौर कांचनाताई यन्नम यांनी केले. दाजीपेठ येथील मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय मुख्य प्रवेशद्वारा समोरील रस्त्याच्या कामाकरीता नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नाने विशेष रस्ते अनुदानातून रुपये 25 लाखाचा रस्ता करण्यात आले. या रस्त्याच्या कामाच्या शुभरंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले, गेली २ वर्षे या रस्त्याचे काम रखडलेले होते. महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून आज या कामाला खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाल्याने हे काम मार्गी लागत आहे. सोलापुर मार्कंडेय सहकारी रुग्णालय ते राम मंदिर ते कलशेट्टी तेल दुकान पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण, रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचा विशेष रस्ते अनुदानातून हे काम हाती घेण्यात आले आहे. मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम यावेळी म्हणाले की, कोरोना पार्श्वभूमीवर कुठलेही कार्यक्रम घेत असताना नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग मास्क वापरणे सतत हात धुणे व स्वच्छता बाबतचे जनजागृती करत सुचनांचे पालन करावे असे आवाहन केले. रुग्णालयाचे माजी चेअरमन डॉक्टर विजयकुमार यांनी आपल्या मनोगतात रुग्णालया करिता सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले ,रस्त्या बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नु, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, नगरसेवक अविनाश बोमड्याल, नगरसेविका व स्थायी समिती सदस्या राधिकाताई पोसा, नगरसेविका रामेश्वरीताई बिर्रु, उद्योजक अंबादास बिंगी दत्तात्रय पोसा ,आनंद बिर्रु, मार्कंडेय रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन तिरुपती विडप, जेष्ठ संचालक अशोक आडम, संचालक अमृतदत्त चिन्नी, प्रकाश म्हंता, रवि भवानी, ज्येष्ठ नागरिक उपेंद्र इगे, नागनाथ सोमा, रामण्णा जोरीगल, अनिल वंगारी कमलेश बल्ला आदी नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143