Maharashtra Maharashtra Gov

बापरे ! सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत ५७ रस्ते पाण्याखाली; या मार्गावरील रस्ते खुले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली-  जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून आज दिनांक 24 जुलैपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व कडेगाव तालुक्यांमधील 57 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे,पुरामुळे,घाट भागात व इतर तत्सम कारणांमुळे (उदा. पूल बुडीत होणे, पूलाचा भराव खचणे इ.) वाहतूक खंडित/बंद पडलेल्या रस्त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

शिराळा तालुका  – मांगले सावर्डे रस्ता बंद. पर्यायी मार्ग मांगले चिकुर्डे पुलावरुन कांदे सावर्डे पुलावरुन सुरु, चरण पथ वारुणी बुरभुशी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. बिळाशी भेडसगाव रस्ता पर्यायी मार्ग कोकरुड – मलकापूर राज्य मार्गावरुन सुरु, सुजयनगर रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही, भाडूगळेवाडी, येसलेवाडी, गुंडंवाढी, खोतवाडी, काशिदवाडी, चिंचेवाडी, खराळे, काळुंद्रे ते राज्यमार्ग रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही

मिरज तालुका – समडोळी कोथळी रस्ता बंद असून पर्यायी रस्ता सांगली मार्गे सुरू, नांद्रे-ब्रम्हनाळ बंद असून पर्यायी वाहतूक नांद्रे – वसगडे मार्गे सुरु, नांद्रे – मौजे डिग्रज रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक कवठेएकंद-वसगडे मार्गे सुरु, पद्माळे-कर्नाळ रस्ता बंद असुन पर्यायी पद्माळे सांगली मार्गे वाहतूक सुरु, कवलापूर-कवठेएकंद रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक तासगाव – सांगली मार्गे सुरु आहे. अंकल – मळीभाग रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक कोल्हापूर रस्त्यावरुन सुरु आहे. कसबे डिग्रज-समडोळी-दानोळी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक बागणवाट रस्त्यावरुन सुरु आहे.

वाळवा तालुका – कासेगाव-काळम्मवाडी-केदारवाडी-साखराळे-खेडपुणदी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक नाही. पेठ – महादेववाडी-माणिकवाडी-वाटेगाव रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक ग्रा.म.14 वरुन सुरु आहे. गौंडवाडी-मसुचीवाडी-खेड-वाळवा- आष्टा रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक राज्य मार्ग 150 वरुन सुरु आहे. बहे – नेर्ले रस्ता बंद असुन पर्यायी वाहतूक प्रजिमा-142 वरुन सुरु आहे. बणेवाडी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक ग्रा.मा. 354 रस्त्यावरुन सुरु आहे. शिरगाव – नागठाणे रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक इजिमा रस्ता क्र. 44 वरुन सुरु आहे. इजिमा क्र. 43 ते कनेगाव-भरवाडी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. इजिमा क्र. 29 ते पेठ-गोळेवाडी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक राज्य मार्ग क्रमांक 150 वरुन सुरु आहे. तुकाईखडी रस्ता बंद असून  पर्यायी वाहतूक प्रजिमा क्र.4 व रा.मा. क्र. 158 वरून सुरू आहे. कासेगाव ते कृष्णाघाट स्मशानभूमी पर्यंत रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. नेर्ले ते बोरगाव रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक इजिमा क्र. 27 व प्रजिमा क्र. 142 वरून सुरू आहे. देसाईवाडी ते मुलाणवाडी (रेठरेहरणाक्ष) रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. ऐतवडे खुर्द पारगांव पाणंद रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही.

पलूस तालुका  – पलूस तालुक्यातील पुढील रस्ते बंद असून पर्यायी मार्ग नाही. तुपारी मार्ग ते रामा.142 रस्ता, भिलवडी सुखवाडी रस्ता, रामा.158 ते आमणापूर माळीवस्ती रस्ता, भिलवडी ते औदूबंर रस्ता, अजिमा.85 ते भिलवडी महाविरनगर हायस्कूल अप्रोच रस्ता, अंकलखोप बावचघाट ते सुभाषनगर रस्ता, भिलवडी हरिजनवस्ती रस्ता, भिलवडी  माळवाडी  रस्ता, नागराळे बुर्ली (चौगुलेनगर) रस्ता, अंकलखोप ते म्हसोबा देवालय रस्ता, रामा.151 पासून भास्कर चौगुले ते पतंग सुर्यवंशी वस्ती रस्ता, इजिमा. 84 खोलेवाडी ते पोल्ट्री फार्म मार्गे रामा.151 ला मिळणारा रस्ता, नागठाणे खोलेवाडी मळीभाग रस्ता, राडेवाडी औंदुबर रस्ता, कुंडल शेरे दुधोंडी रस्ता, नागराळे नागठाणे नदीकाठचा  रस्ता, पुणदी जाधवमळा इनामपट्टा  रस्ता, बुर्ली मुकुंदनगर रस्ता, अंकलखोप रामानंदनगर रस्ता, आमणापूर बुर्ली (वन मार्ग) रस्ता, आमणापूर आुगडेवाडी रस्ता, अंकलखोप ग्रामपंचायत पासून बिरोबा देवालय  रस्ता, बुर्ली नलवडेवस्ती रस्ता, बुर्ली  नळवाडी (पदाप्वावस्ती) रस्ता, घोगांव पाणंद रस्ता, राडेवाडी सावंतवस्ती रस्ता, भिलवडी पाणंद रस्ता, दुधोंडी नागराळे चौगुलेनगर ते प्रजिमा. 32 पर्यंत रस्ता, अंकलखोप वैभवनगर राडेवाडी खोलेवाडी (सुर्यनगर) पर्यंत रस्ता, रामा.142 पासून घोगांव  दुधोंडी  प्रजिमा.36 पर्यंत रस्ता, मोराळे सांडगेवाडी आुगडेवाडी तावदरवाडी हजारवाडी ते रामा.51 ला मिळणारा रस्ता. कडेगाव तालुका – आसद चिंचणी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग आसद मोहितेवडगांव व आसद पाडळी रस्त्यावरुन  वाहतूक सुरु आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com