Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
शिर्डी Rule – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 110 पार गेली आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, लाखो भक्तांचे शक्तीस्थळ असलेले शिर्डीतील साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे. यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे. शिर्डी साई संस्थानच्या वतीने साईदर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.
पुण्याला जाताना या नियमावली जाणून घ्या अन्यथा…
साई संस्थानकडून नियमावली Rule जाहीर
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ३१ डिसेंबर हा दिवस शिर्डी महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नाताळ सुटी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त होणारी संभाव्य गर्दी व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी गैरसोय Rule टाळण्यासाठी शिर्डीला यावे. दरवर्षी नियमित पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन संस्थानच्या Rule मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बागायत यांनी केले.
साईभक्तांनी व मंडळांनी पालखी आणू नये
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे श्रींच्या दर्शनासाठी ठराविक संख्येने मंदिरात प्रवेश दिला जात असल्यामुळे व दर्शनपास वितरण काउंटरवर होणाऱ्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंग निश्चित करून साईभक्तांनी शिर्डीत दर्शनासाठी यावे. अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews