Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, सोलापूर महानगरपालिका आणि रुपाभवानी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्र काळात भाविकांना देवी दर्शन करता यावे यासाठी ऑनलाईन पास प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दर्शनास येण्यास इच्छुक भाविकांनी ऑनलाईन पास बुकिंग करून स्वतःचे दर्शन पास www.shrirupabhavanidevasthan.com या संकेतस्थळावरून काढून घ्यावे. असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास नसणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
1) श्री रूपा भवानी देवस्थान
2) श्री शिवगंगा मंदिर देवस्थान
3) श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका मंदिर
3) हिंगुलांबिका मंदिर
4) कालिका मंदिर पाच्चा पेठ
5) शिवलाड तेली समाज शुक्रवार पेठ
पास काढण्यासाठीची प्रक्रिया
1. दर्शन पास काढण्यासाठी भाविकांनी कोव्हिशील्ड/कोवक्सीन या लसीचे २ डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.
2. दर्शनास येताना सोबत लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि तसेच स्वतःचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
3. भाविकांनी या
www.shrirupabhavanidevasthan.com दिलेल्या लिंकवर क्लिक करून दर्शन संकेतस्थळावर जावे, तिथे दर्शनासाठी आवश्यक असणारे सर्व नियम दिलेले आहे, ते वाचून भाविकांनी त्या खाली दिलेले दर्शन पास चे फॉर्म भरावे.
4. भाविकांना फॉर्ममध्ये देवस्थान, दर्शनाची तारीख , दर्शनासाठीचे वेळ निवडायचे आहे आणि त्याखाली स्वतःचे व दर्शनासाठी सोबत येणाऱ्या भाविकांची माहिती भरायची आहे.
5. माहिती पूर्ण भरून झाल्यांनतर सबमिट करावे जे पास दिसेल त्या पासचे स्क्रिन शॉट काढून घ्यावे आणि दर्शनास आल्यानंतर ते स्क्रिन शॉट दाखवणे आवश्यक आहे.
6. ज्या इच्छुक तारखेस आपण दर्शनास जाणार आहे त्या तारखेच्या दोन दिवस अगोदर आपण दर्शन पास बुकिंग करू शकता.
भाविकांनी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करून दर्शन घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143