Health International

रुपाली चाकणकरांचा आरोप; घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे- घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे.

              रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. त्यांनी पोस्टबरोबर एक व्हिडीओही शेअर केला आहे. घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करtन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय… किती लोकांना अटक करणार मोदीजी?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com