Economy Maharashtra

परंपरा आणि स्वरूप’ विषयावर संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली-  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत संतसाहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे हे उद्या ९ एप्रिल २०२१ रोजी ‘वारी : परंपरा आणि स्वरूप’ या विषयावर  व्याख्यानमालेचे २२ वे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. ९ एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या बाविसाव्या दिवशी डॉ.रामचंद्र देखणे हे दुपारी ४.०० वाजता विचार मांडणार आहेत.

डॉ.रामचंद्र देखणे यांच्या विषयी

साहित्यिक, संतसाहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार, किर्तनकार आणि भारुडकार म्हणून डॉ.देखणे परिचित आहेत. बीएससी आणि एमएची पदवी संपादन करून त्यांनी पीएचडी ही मिळविली आहे. डॉ.देखणे यांनी ललित, संशोधनात्मक तसेच चिंतनात्मक अशी विविधांगी साहित्य निर्मिती केली असून त्यांची ४७ पुस्तके प्रकाशित आहेत. यात ‘हौशी लाख्यायी’, ‘गोरज’, ‘येरवाळीच येण’, ‘साठवणीच्या गोष्टी’ असे कथा संग्रह तसेच ‘भूमिपूत्र’ आणि ‘गोपा निनाद’ या कादंबरींचा समावेश आहे. ‘तुका म्हणे जागा हिता’, ‘वारी ; स्वरूप आणि परंपरा’, ‘आनंदाचे डोही’ आदी संत साहित्यावरील १५ पुस्तके प्रकाशित आहेत. डॉ.देखणे यांची लोकसाहित्याची व वैचारीक पुस्तकेही प्रकाशित आहेत. बालसाहित्यावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर झाले असून त्यांनी काही पुस्तकांचे संपादनही केले आहे. इंदोर, बडोदा आदींसह अमेरीका, दुबई येथील त्यांची व्याख्याने विशेष गाजली आहेत. त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्ष पद भूषविले आहे. डॉ.देखणे यांनी प्रवचन, किर्तन, भारूडाचे सादरीकरण करून संत विचार महाराष्ट्रासह देश विदेशात पोहोचविले आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143