fbpx
same school contracted corona
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

The reduction in the number of corona patients has been a relief

तेलंगणा Covid 19- कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.  कोरोनाची रुग्णसंख्या घसरल्यामुळे शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण अशातच तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातील रेसिडेंशियल शाळेतील 28 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचवेळी इतक्या मुलींना कोरोनाची लागण झाल्यामुळे समुह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालेय. कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली अन् पाल्यांना घरी पाठवण्याची विनंती केली. येथील आरोग्य विभागाने शिक्षकांसह सर्व विद्यार्थी Student आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेसिडेंशियल  शाळेत Residential school 575 विद्यार्थी आहेत. तेलंगणा आरोग्य मंत्री टी. हरीश राव यांनी फोन करत याबाबतची अधिक माहिती घेतली असून, काही सूचनाही केल्या आहेत. तेलंगणा आरोग्य मंत्री टी. हरीश राव यांनी अधिकार्यांना आणखी चांगली आरोग्य व्यवस्था प्रदान करण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा सल्ला दिलाय. एक सप्टेंबरपासून तेलंगणामधील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण येथील कोरोनाची स्थिती अद्याप सुधारलेली दिसत नाही. तेलंगणा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तेलंगणात 103 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांमध्ये तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणं उघडली जात आहेत. मात्र, लोकांकडून कोरोना नियमांचं पालन झालेलं दिसत नाही.

आंध्रप्रदेशातील भयानक पावसामुळे मोठ्या धरणाला तडे गेल्याची भीती

         देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर देशात 24 तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात 538 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (Sunday) 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 4 लाख 65 हजार 911 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update