Sangvi village, representatives
Solapur City

सांगवी गावाला पूर्वसन करा , गावकऱ्यांची लोकप्रिनिधी व प्रशासनासमोर आर्तहाक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अक्कलकोट (प्रवीणकुमार बाबर) – हस्त नक्षत्राच्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या तुफानी पावसामुळे कुरनुर धरणांची धोक्याची पातळी गाठली होती. यामुळे पाटबंधारे विभागाने पहाटे तीन हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे नदीकाठच्या सर्व घरे ताबडतोब रिकामी करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हरणा नदीला पूर आल्याने बोरी नदी व हरणा नदीचा संगम कळेगाव या ठिकाणी होत असल्याने दोन्ही बाजूच्या नदीचे पाणी तुंबून सांगवी बु व काळेगाव चा संपर्क तुटला. दरम्यान, सांगवी बु , रामपूर, आंदेवाडी या सर्व गावांची पुरसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहहयक कलेक्टर मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट , आमदार सचिन कळ्यांणशेट्टी, सी ई ओ दिलीप स्वामी, वागदरी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, अप्पू बिराजदार, यासह अनेक आधिकारी व लोकप्रनिधींनी या पुरसदृश्य परिस्थिती पाहणी केली व नागरिकांचे म्हणणे ही ऐकून घेत त्यांना सूचना ही दिल्या, दरम्यान सांगवी बु गावचे सरपंच वर्षा भोसले यांनी गतवर्षीच्या पुराची पुनरावृत्ती झाली असून, आम्ही रातोरात नदीकाठच्या सर्व घरांना स्थलांतरित केले जनावरे, कोंबड्या, अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू हलविताना दमछाक झाली होती. यावर सर्व प्रशासनाला आम्ही गावकऱ्यांच्या वतिने विनंती करतो की, आमचे सांगवी बु हे गाव तत्काळ पूर्वसन व्हावे, गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे, यासंख्या अनेक दिगग्ज नेत्यांनी सांगवी बु जलाशय व गावात पाणी घुसलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी, तत्कालीन सरपंच अबूबकर शेख यांनी मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन गाव पूर्वसनाची मागणी केली होती.

हे वाचा- सी ई ओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते सेविकांचे सत्कार; शिरवळ येथे पोषण जत्रा कार्यक्रम संपन्न

 Sangvi village, representatives

             प्रशासनाने तो फक्त देखावाच केला असून, या अशा वारंवार पूर येऊन सांगवी गावाला धोका निर्माण होत असून, याबाबतीत जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावांतील कित्येक पिके वाहून गेली, आणि कित्येक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावे,आणि गाव पुनर्वसनाची मागणी सरपंच वर्षा भोसले यांनी यावेळी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना केली. यावेळी, सर्कल एम कांबळे तलाठी एस आय शेख, ग्रामसेवक शैलजा पोमाजी, पोलीस पाटील शुभांगी बाबर , कोतवाल जाकीर कागदे, जावेद मुल्ला, राजू खरात , यातीराज भोसले, वसीम शेख, अबूबकर शेख, विष्णू भोसले, अंकुश घाटगे, इरफान शेख, आशाबाई आवटे, निलाबाई शिंदे, यासह गावातील तमाम नागरिक उपस्थित होते.

       सांगवी हे गाव धोक्याच्या स्थितीत असून, गतवर्षी पासून पुराचा धोका बसत असून, सांगवी बु हे गाव पुनर्वसन होणे गरजेचे आहे. गाव पुनर्वसनासाठी मी माझी स्वतःची ११ एकर जमीन अधिग्रहण साठी देण्यास तयार आहे.
■ मेजर बाळासाहेब भोसले, सांगवी बु

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143