Maharashtra

जलजीवन मिशनअंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बुलडाणा- जलजीवन  मिशन अंतर्गत दरडोई 55 लिटर पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार पाणीपुरवठा योजनांवर काम करण्यात येत आहे. जलजीवन  मिशन अंतर्गत जिल्ह्यात 65 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. त्यांना जिल्हा समितीने मान्यता दिली असून या सर्व योजनांची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज जलजीवन  मिशनची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्ष मनिषा पवार, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते. जलजीवन मिशनमध्ये घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना ह्या जुन्याच असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, योजनांची नावे बदलण्यात येत असून मिशनमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. या योजनांवर करोडो रुपये खर्च होतात. परंतु पाणीटंचाई कायम राहते. त्यामुळे ही कामे दर्जेदार करण्यात यावी. योजनेत घेण्यात आलेल्या गावांची पाणीटंचाई संपुष्टात यावी. पाणीपुरवठा संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून पुढील बैठकीत सर्व तक्रारींचा सुस्पष्ट अहवाल तयार करून सादर करावा. जिल्ह्यातील एकही गाव पाणीपुरवठा योजनेतून सुटता कामा नये, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, तसेच 2024 पर्यंत मिशनमधील योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी यंत्रणांनी कामाचा वेग वाढवावा. दर्जेदार कामे करावी. योजना पूर्ण करून 100 टक्के  घरांना पाणी मिळाले पाहिजे.  तर भविष्यात पाण्याची समस्या वाढणार असून त्या दृष्टीने प्रयत्न करावे असेही खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले. याप्रसंगी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  घुगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com