Education/Collage/School Solapur City Technology

‘स्कूल कनेक्ट’ अभियानामुळे पॉलिटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर जिल्हा विनाअनुदानित तंत्रनिकेतन संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे विनाअनुदानित तंत्रनिकेतन संघटनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले. तंत्रनिकेतनच्या वेगवेगळ्या समस्यांवर विचार व्हावा यासाठी संघटनेचे अध्यक्ष ऍड विजय मराठे, उपाध्यक्ष डॉ जी के देशमुख, सचिव गजानन धरणे, कोषाध्यक्ष श्रीकांत जोशी, प्राचार्य एस एम शेख, प्राचार्य शंभूराज देशमुख, सांगोल्याचे प्राचार्य देशमुख पंडित भोपळे, प्राचार्य सरफराज शेख, पंढरपूरचे प्राचार्य मिसळ, प्राचार्य मोहन देशपांडे, प्रा सौ. नागणसुरे, प्राचार्य हिंदुराव गोरे व विविध तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते. यावर्षी तंत्रनिकेतन संचालनालयाच्या वतीने डॉ. अभय वाघ यांनी घेतलेल्या “स्कूल कनेक्ट” या अभियानामुळे व संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लावल्याने पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्येत वाढ झाले असल्याचे मत याप्रसंगी मांडण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने जनता दरबार भरून एक अभिनव उपक्रम मंत्रालय आपल्या दारी याची प्रचिती करून दिल्याबद्दल उदय सामंत व कुलगुरू मृणालिनी फडणीस मॅडम यांचे अभिनंदन करून सर्व टीमचे आभार मानले. याप्रसंगी विविध तंत्रनिकेतन मधिल शिक्षकवर्ग उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143