Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर School- सद्गुरु बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-मजरेवाडी सोलापूर येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री वंजारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोलापूर-गाणगापूर एसटी बस अपघात; गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपये
School कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उषा सुरवसे मॅडम होते. सौ. पद्मा पाटील मॅडम यांनी “सद्गुरु सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी असेच शैक्षणिक कार्य हाती घ्यावे” ,असे म्हटले. तसेच कार्यक्रमात मिलिंद गायकवाड सर व प्रकाश राचेटी सर यांनी लोकमान्य टिळकांविषयी सविस्तर माहिती सांगत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल माहिती दिली,तसेच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी मत मांडून आपले भाषणे सादर केली. भाषणे केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सुरवसे,शकीला इनामदार मॅडम, प्रकाश राचेटी सर, पदमा पाटील मॅडम, आमसिद्ध तीर्थकर सर, अप्पाशा उबंराणी सर, ललिता राठोड मॅडम, बसवराज निवर्गी सर, सिराज नदाफ सर तसेच सदगुरू बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री वंजारे व संस्थेचे कार्याध्यक्ष तुकाराम देवर कोंडा , मिलिंद गायकवाड सर व राजू नामन उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143