Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
मुंबई School – राज्यातील शाळा नुकत्याच पुन्हा सुरू केल्यानंतर शाळा पुन्हा बंद करण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनची भीती देशात वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असे म्हटले आहे.
रनिंगमध्ये पोलीस भरतीत जास्त गुण मिळवून देणे पडले महागात
School देशात सध्या ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा महाविद्यालयांना गेल्या दोन वर्षांपासून टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
देशातील एकूण २१३ ओमिक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात ५४ रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे अशा प्रकारे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews