fbpx
school Surya Namaskar nectar festival

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापुर School – ७५ करोड सुर्यनमस्कार राष्ट्रीय संकल्पात सोलापुर जिल्यातील अकरा कोटी सुर्यनमस्कारात ” एसव्हीसीएस”चे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्काराव बाबर यांनी केले. देशाच्या ७५ व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन आयुष मंञालय आणि फीट इंडीया याच्या सौजन्याने गीता परीवाराच्या वतीने आणि जि.प.व मनपा शिक्षण विभाग यांच्या समन्वयातुन बुधवारी सकाळी अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी शिक्षण संकुलात एस.व्ही.सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एमआयडीसी सोलापुर येथे सामुहीक सुर्यनमस्कार पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.

बनावट मृत्युपत्र प्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

school Surya Namaskar nectar festival
school Surya Namaskar nectar festival

         याप्रसंगी बाबर म्हणाले की,मन,मनगट व मेंदु सक्षम करायचे असेल,विद्यार्थ्यांच्या हृदयात व मनात क्रांतीची ज्योत निर्माण होऊन सुर्य नारायणासारख्या तेजेस्वी रुपाने व्यक्तीमत्व निर्माण करायचा असेल तर योगासन गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती साविञीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन शिक्षणाधिकारी बाबर व ७५ करोड सुर्यनमस्काराचे राष्ट्रीय प्रकल्प प्रमुख संगिता सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर राष्ट्रीय समुहगान अंतर्गत राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व सत्कार  School प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांनी केले. प्रशालेची विद्यार्थीनी सई गुरव हिने सर्व विद्यार्थ्याना संकल्पाची शपथ दिली. प्रशालेतील सुमारे ३०१२ विद्यार्थ्यानी ढोलताशाच्या तालावर अतिशय मनमोहक व आकर्षक पध्दतीने सुर्यनमस्कार करुन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्याचे कौतूक केले व नियोजनबध्द कार्यक्रमाची वाहवा केली. यावेळी राष्ट्रीय योगा फेडरेशन जिल्हा समन्वयक मिहीर जाधव,जिल्हा क्रीडाधिकारी नितीन ताराळकर, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे,उत्तर सोलापुर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बापुराव जमादार, अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, शेळगी केंद्राचे केद्रप्रमुख बापुसाहेब पाटील, बीआरसी प्रमुख बी.एम सोनकडे, उपमुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक व्ही.ए.म्हमाणे अदि मान्यवर उपस्थित होते.
                  प्रशालेचे समन्वयक प्रभुलिंग गवसने,सतिश म्हमाणे,क्रीडाशिक्षक मल्लिकार्जुन शिळ्ळे यानी सुर्यनमस्कार घेतले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत धनवे,महेश कोरे,पंडीत स्वामी,योगेश हिरेमठ,प्रविण येळुरे,ओंकार मुंढे ,शिवराज पाटील,सिध्दाराम पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय नकाते यांनी केले.यावेळी सर्व School  शिक्षकशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी योग गणवेशात उपस्थित होते.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update