school will be started or not
Covid 19 Health Maharashtra

School : शाळा चालू होणार की नाही आरोग्यमंत्र्यांचं महत्त्वाचे वक्तव्य

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

जालना School –  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आढळला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात असून, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची मोठी लाट ओसरल्यानंतर अनेक ठिकाणचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्याशिवाय एक डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा (School ) सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. शाळेबाबत आरोग्य विभागाने (Health Department) परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक

       दरम्यान, राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी (Permission) दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये आरोग्य (Health) मंत्री राजेश टोपे तसेच राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आरोग्य सचिव या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा (Discuss ) होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

हे वाचा – लवकरच मुंबई-पुण्यात वादळी वाऱ्यासह बरसणार सरी; मराठवाड्यालाही अवकाळी पावसाचा धोका

लसीकरणाची सक्ती केली जाऊ शकत नाही.

लसीकरणाची सक्ती केली जाऊ शकत नाही. मात्र, लसीकरण करावे यासाठी प्रभावी पद्धतीने लोकांना समजवून सांगण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मॉल्स ,थेटर सगळीकडे अटींसह परवानगी दिलेली आहे. पुढील काळात संक्रमण लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करायचे का या बाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

विमान प्रवाशांमुळे होणारा प्रादुर्भाव त्यावरील उपायांची चर्चा करण्यात येणार

दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला सामोरे जाण्यासाठीच्या सज्जतेबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचाशिवाय या बैठकीत दक्षिण आफ्रिका तसेच इतर युरोपियन राष्ट्रातून येणाऱ्या विमान प्रवाशांमुळे होणारा प्रादुर्भाव त्यावरील उपायांची चर्चा करण्यात येणार असल्याचीही महिती समोर आली आहे.

शनिवारी संध्याकाळी भारतात ओमिक्रोन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले

नव्या व्हेरिएंटनेही भारतात एन्ट्री केली आहे. शनिवारी संध्याकाळी भारतात ओमिक्रोन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकावरुन भारतात परतलेल्या दोन प्रवासी ओमिक्रोन व्हेरिएंटपासून बाधित असल्याचं शनिवारी समोर आलं आहे. यानंतर कर्नाटकसह देशभरात हायअलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रोन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews