Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर School- ग्रामीण भागातील सर्व शाळा सोमवार 7 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
मुंबईत 7 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा धडकणार
सोलापूर शहरातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा 2 फेब्रुवारी पासून सुरू झाल्या. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी नवीन नियम घालून शाळा School सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागातील शाळा मात्र सुरू करण्यात आल्या नाहीत. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी एक आठवडा निर्णय घेतला नाही. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, डॉ अनिरुद्ध पिंपळे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, उपशिक्षणाधिकारी जविर,सिव्हील हॉस्पिटलच्या कोविड समन्वयक डॉ अग्रजा चिटणीस, महापालिका प्रशासन अधिकारी कादर शेख यांची उपस्थिती होती.
सीईओ स्वामी यांनी शाळा School सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले. शहरातील शाळा सर्व नियम पाळून व्यवस्थित पणे सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास हरकत नाही अशी चर्चा झाली. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती दिली की, सोलापूरच्या ग्रामीण भागातील कोरुना रुग्णांची संख्या कमी झाले आहे पूर्वी दिवसाला सातशे रुग्ण आढळून यायचे मात्र आता ही संख्या दोनशे ते अडीचशे वर आली आहे लसीकरण 90 टक्के पूर्ण झाले आहे त्यामुळे सोमवार पासून शाळा व कॉलेज शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करणार, सर्व नियम व अटी पाळून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क, शिक्षकांना दोन डोस बंधनकारक आहेत. पालकांचे सुध्दा कोरोना प्रतिबंधक डोस बंधनकारक असून हे सर्व नियम पाळून शाळा सुरू होतील.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews