science-day-organizing-competitions
Education/Collage/School

Science Day : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात व्याख्यान, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, पोस्टर स्पर्धांचे आयोजन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Science Day- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (आरजीएसटीसी) यांच्यातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि पोस्टर व मॉडेल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

अनुसूचित समाजाच्या उद्धारासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील: आ. सुभाष देशमुख

            Science Day दि. 24 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती समन्वयक प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व 11 संकुलातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा 24 फेब्रुवारी 2022 रोजी होतील. पोस्टर मॉडेल्स स्पर्धा 28 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर हे ‘सिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी प्रत्येक संकुलातून एक संघ सहभागी होईल तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक संकुलातून पाच स्पर्धक सहभागी होतील. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठीचे प्रश्न विज्ञानावर आधारित असतील. तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी महिलांचे विज्ञानातील योगदान, वैश्विक महामारी: वैद्यकशास्त्राचे वाढते महत्त्व, शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन हे तीन विषय असतील. वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित पोस्टर व मॉडेल्स तयार करता येईल.

               राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त Science Day पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रम घेण्यासाठी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनकडून सहकार्य लाभले आहे. त्यांच्या संयुक्त माध्यमातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रश्नमंजुषाकरिता प्रा. सी. जी. गार्डी, वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ. व्ही. पी. धुळप आणि पोस्टर प्रदर्शनासाठी डॉ. ए. आर. शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com