fbpx
Seizure Program Solapur District

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Seizure –  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दि. 12 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:- गुरुवार, दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी रात्रौ 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम.

              Seizure  शुक्रवार, दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मोटारीने नियोजन भवन, सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 10.10 वा. नियोजन भवन येथे आगमन व पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन. सकाळी 10.30 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे सोलापूर स्मार्ट सिटी आढावा बैठक. सकाळी 11.00 वा. नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना करिता नियोजन समिती आढावा बैठक. दुपारी 1.00 ते 2.00 राखीव. दुपारी 2.00 वा. नियोजन भवन येथे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक व सादरीकरण तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक आणि सादरीकरण.                              
                   दुपारी 3.00 वा. मोटारीने कुंभारी (जिल्हा सोलापूर) कडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता मौजे कुंभारी (जि. सोलापूर) येथे रे- नगर गृह प्रकल्प भेट व आढावा बैठक आणि सादरीकरण. सायंकाळी 4.30 वा. रे-नगर, कुंभारी (जि.सोलापूर) येथे महावितरण कंपनीच्या 33/11 के.व्ही उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रम. Seizure  सायंकाळी 4.45 वा. मौजे कुंभारी (जि. सोलापूर) येथे धन्यवाद मोदीजी कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.45 वा. मोटारीने शिवछत्रपती रंगभवन सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वा. शिवछत्रपती रंगभवन येथे सोलापूर ग्रंथोत्सव २०२२ उद्घाटन सोहळा. सायंकाळी 7.00 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व सोलापूर उद्योजक व्यावसायिकांशी चर्चा. तसेच शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.
                  शनिवार, दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मोटारीने हत्तरसंग- कुडल तालुका दक्षिण सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. हत्तरसंग- कुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथे संगमेश्वर यात्रा महोत्सवास उपस्थिती. Seizure सकाळी 11.00 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण आगमन व राखीव. सकाळी 11.45 वा. मोटारीने सिद्धेश्वर मंदिर सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता सिद्धेश्वर मंदिर येथे आगमन, पूजा व अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव. Seizure  दुपारी 1.30 वाजता मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने लोणी ता. राहता, जि. अहमदनगर कडे प्रयाण. 
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update