service gradually resumed
Maharashtra

Bus : सातारा आगाराची परिवहन सेवा हळूहळू पूर्वपदावर; 532 कर्मचारी हजर तर १२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सातारा आगारातून सातारा पुणे सेवेची जवाबदारी वरच असून अद्यापही लाल परी डेपोतून बाहेर पडलेली नाही .एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप ही सुरू असून, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तरीही परिवहन मंडळातर्फे आर्थिकहानी टाळण्यासाठी व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये, याकरीता एसटीची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सातारा Bus –  सातारा आगाराची परिवहन सेवा संप सुरू असतानाही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे . सोमवारी आगाराचे 532 कर्मचारी हजर (Present) झाल्याची माहिती असून बारा कर्मचाऱ्यांवर (Staff) निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे . दरम्यान, सातारा आगारातून सातारा पुणे सेवेची जवाबदारी वरच असून अद्यापही लाल परी डेपोतून बाहेर पडलेली नाही .एसटी कर्मचाऱ्यांचा (Staff) संप अद्याप ही सुरू असून, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तरीही परिवहन मंडळातर्फे आर्थिकहानी टाळण्यासाठी व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये, याकरीता एसटीची (Bus) सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोमवारी ही स्वारगेट, मुंबई, कराड यादी मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. तसेच काही ग्रामीण भागत ही लालपरीची सोय करण्यात आली होती.

      सोमवारी एकूण ५३४ कर्मचारी (Staff) हे आपल्या सेवेवर रूजू झाले होते. तसेच आंदोलनातील एकूण १४ कर्मचाऱयांवर (Staff) निलंबणाची कारवाई करण्यात आली. यापूर्वी काही कर्मचाऱयांना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. सोमवारी मात्र केवळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. एकंदरीत परिस्थिती पाहता हळू हळू प्रवाश्यांच्या सेवेकरीता दाखल होणाऱया एसटीची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

हे वाचा – अखेर भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

         खासगी शिवाशाही बरोबरच लालपरी ही सेवेकरीता दाखल झाली होती. यामध्ये सोमवारी सातारा ते स्वारगेट २२ गाडय़ा सोडण्यात आल्या (एकूण जाऊन-येऊन ४४ फेऱया), सातारा ते मुंबई ४ गाडय़ा, सातारा ते कराड १, कराड ते स्वारगेट-१, पाटण मधुन ४ ग्रामीण भागात गाडय़ा सोडण्यात आल्या. यामध्ये कोयनानगर, कुर्सुंडी आदी गावांमध्ये या गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. तसेच महाबळेश्वर ते तापोळा मार्गावर एक एसटी सोडण्यात आली होती. ग्रामीण भागत ही एसटी सुरू होत असल्याने प्रवाश्यांकडून ही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews