shiv-sena-cycle-rally-against
Maharashtra Economy

शिवसेनेतर्फे अहमदनगरमध्ये महागाई विरोधात सायकल रॅली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अहमदनगर – आज महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकारचे (Central Government) याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून, महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या कोणत्याही उपयाययोजना होतांना दिसत नाही. फक्त 100 कोटी लसीकरण केल्याची जाहिरातीतच मग्न आहेत. त्यांच्या सर्वसामान्यांचे कोणत्याप्रकारचे देणे-घेणे नाही. केंद्र सरकारला जागा आणण्यासाठी सायकल रॅली (Bicycle rally) काढून वाढत्या महागाईचा निषेध करीत आहोत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.

   शिवसेना युवा सेनेच्यावतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायकल रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, हर्षवर्धन कोतकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, बबलू शिंदे, दत्ता कावरे, श्‍याम नळकांडे, परेश लोखंडे, सुमित धेंड, नरेश भालेराव आदी उपस्थित होते.

हे वाचा- आरोग्य विभागाच्या परीक्षेत कॉपी करताना तिघांना पकडले

        याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, की सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असून, केंद्र सरकारकडे जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंचे वाढत असलेले भावामुळे नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्व अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडे घेत असल्याने दरवाढीबाबत तेच जबाबदार आहेत. पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे त्यांचा इतरही वस्तूंवर मोठा परिणाम होत असल्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डीझेलचे दर नियंत्रणात ठेवणे हे केंद्राच्या हाती आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना दरवाढ कमी व्हावी, अपेक्षा आहे. या रॅलीत आदिनाथ कोतकर, सागर जग्गड, स्वप्नील ठोसर, गिरीधर हंडे, अभय बडे, श्रीकांत चेमटे, प्रसन्न वाळूंजकर, मृणाल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143