Covid 19 Maharashtra

यंदा कोरोना महामारीमुळे शिवयोग धाम येथील गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- गुरुपौर्णिमेनिमित्त शेळगी येथील शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोव्हीड महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे. श्री शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा- शहर उत्तरचा विकास आ.विजयकुमार देशमुख यांनी केला; बाळे भागात येणारा नगरसेवक भाजपचाच

               दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने शिवयोग धाम सेवा समिती शेळगी, च्यावतीने गुरुपौर्णिमा व डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो.तसेच समाजाच्या कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी धार्मिक कार्यक्रम, पूजा, महाप्रसाद आदींचे आयोजन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात केले जाते. परंतु कोव्हीड महामारीमुळे खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामींचा जन्मदिवस व गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी घरीच गुरुस्मरण करावे. प्रतिवर्षी साजरा होणारा उत्सव यंदा होणार नसल्याची नोंद भक्तांनी घ्यावी असे आवाहन शिवयोग धाम सेवा समितीने केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com