Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शिवभोजन योजनेतून गरजुंना शिवभोजन थाळी एक महिना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील शिवभोजनास भेट दिली असता शिवभोजन केंद्राची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना यांच्याकडे शिवभोजन केंद्राची संख्या वाढविण्यात यावी याबाबत मागणी केली. यानुसार मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरात 2 ते 3 दिवसामध्ये शिवभोजन केंद्राच्या संख्येमध्ये वाढ होईल असे सांगितले. सदर केंद्र वाढल्यामुळे सोलापूरातील गोर-गरीब जनेतला या लाभ होईल.
#solapurcitynews