fbpx
shooting-of-ghungru-movie-started

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

परळी वैजनाथ-  सामाजिक कथेवर आधारित “घुंगरू” या चित्रपटाचे परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई परिसरात चित्रीकरण सुरू आहे. ग्रामीण भागातील कलाकार आणि मनाला साद घालणारी कथा असल्याने चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली आहे. चित्रीकरणादरम्यान परिसरातील नागरिकांनी कलाकारांना आपुलकिची वागणूक देऊन आदरसत्कार केला. यामुळे कलाकारही भारावून गेले.
“घुंगरू” या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ जिल्हा मजूर संस्था चेअरमन बन्सीअण्णा शिरसाट, मालेवाडीचे सरपंच भुराज बदने, सेवानिवृत्त वनअधिकारी ईश्वर केंद्रे, पंकज केंद्रे, पत्रकार गोविंद महाराज केंद्रे, बाळासाहेब फड, भास्कर केंद्रे यांच्या उपस्थितीत पार पाडला. मराठी चित्रपट घुंगरू लवकरच आपणास पाहायला मिळेल. हा चित्रपट लोककलावंतांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाचे निर्माते बाबा गायकवाड असून श्री चिंतामणी सिनेक्रिएशन निर्मित घुंगरू या चित्रपटामध्ये बाबा गायकवाड, गौतमी पाटील, प्रशांत तोतला, उषा चव्हाण, श्रीकृष्ण ढाकणे, शितल गीते, रोशनी कदम रंजीत जाधव, वैभव गोरे, स्वप्नाली पाटील, महेश सावंत, श्रीमंत ढाकणे, सुदाम केंद्रे, सानिका भागवत, सुमीत मेरगळ, अर्जुन कांबळे, भगवान दहिफळे, साक्षी गायकवाड, दत्तराज तोरणे, मारुती वाघ व घाडगे नानी व इतर कलाकारांनी या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्याअसून या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप डांगे हे करत असून या चित्रपटाचे चित्रीकरण सिनेमॅटोग्राफर रवींद्र लोकरे हे करीत असून असिस्टंट सुनील साबळे हे काम पाहत आहेत. या चित्रपटाची रंगभूषेचे काम श्रद्धा बनकर व ऋतुजा गव्हाणे हे करीत आहेत.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update