showers with strong winds
Environment Maharashtra

Stormy winds : लवकरच मुंबई-पुण्यात वादळी वाऱ्यासह बरसणार सरी; मराठवाड्यालाही अवकाळी पावसाचा धोका

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई Stormy winds : –  मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस (Rain in Maharashtra) पुन्हा एकदा आगमन करण्याच्या तयारीत आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विविध जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने मंगळवारी (30 नोव्हेंबर) मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह (Thunder) वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews