Solapur City

” शुभमंगलयोग ” या वधू वर परिचय विशेषांकाचे आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन.

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

संत सेना सेवा प्रतिष्ठान, सोलापूर च्या वतीने सलग दहाव्या वर्षी आयोजन
 सोलापूर – महाराष्ट्रातील नाभिक समाजातील शेवटच्या घटकांची सेवा करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत सेना सेवा प्रतिष्ठान, सोलापूर च्या वतीने नाभिक समाजातील सर्व पोटजातीसह वधूवरांसाठी मोफत राज्यस्तरीय नाभिक वधू वर पालक परीचय मेळाव्याचेे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत माजी सहकार मंत्री आ. सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्राम रुद्रार यांनी करताना दहा वर्षाच्या वाटचालीमध्ये सर्वात विक्रमी अश्या १००५ हा आकडा पार पाडल्या बद्दल सर्व समाजबांधवा प्रती ऋण व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी आ. सुभाष बापू देशमुख यांनी बोलताना समाजातील जडणघडणी मध्ये नाभिक समाज हा कायम अग्रेसर असुन प्रामाणिक प्रयत्न करुन समाजाची सेवा करण्याचे कार्य सातत्याने करत असल्याबद्दल अभिनंदन केले. त्याच बरोबर नाभिक समाजाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्राम रुद्रार, हिंदुराव गोरे, सुशांत क्षीरसागर, मोहन जमदाडे, नीलकंठ हल्लाळीकर, माधुरी पारपल्लीवार, संजीवनी गोरे, शोभा राऊत, भारती हडपद, अलका ताटे, उज्वला यादव, वनिता मालतुमकर, सुरेखा चौधरी, दिलीप गोरे, प्रमोद यादव, गोपाळ नाडीगोटु, दर्याप्पा हडपद, पवन शिंदे, राजु शुक्कलवार, मल्हारी राऊत, प्रकाश जोगीपेठकर, चंद्रमौळी तमनुर, महेश मंगले, राम राऊत, राम माने, बापू काळे, लक्ष्मण राऊत, विजयकुमार साळुंखे, राजु झंपाल, बालाजी वेलपुकोंडा, अरुण राऊत, समर्थ उबाळे, राजु मालतुमकर आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश जोगीपेठकर यांनी तर आभार चंद्रमौळी तमनुर यांनी मानले.
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क…
– *हिंदुराव दिनकरराव गोरे*
संचालक – संत सेना सेवा प्रतिष्ठान, सोलापूर
७७७४०२४९६७

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143