Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूरातील सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निक तर्फे “सिद्धो क्विज २१” ही राज्यस्थरीय क्विज कॉम्पिटिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाइन घेण्यात आले. “सिद्धो-क्विज- २१” या एकदिवसीय स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी धरणे यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व या COVID-19 Pandamic काळात अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्व आणि उपलब्ध संधी बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रमोद शिवगुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्विज कॉम्पिटिशनचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रा. प्रमोद मेणसे यांनी स्पर्धेचे स्वरूप विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने माहिती दिले.
स्पर्धेसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी क्षेत्रातील २९० हुन अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली होते. तसेच या सोहळ्याचा ऑनलाइन पारितोषिक वितरण सोहळा प्राचार्य गजानन धरणे व इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रमोद शिवगुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत प्रदीपकुमार मयुरेश कुंभार (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे) याने प्रथम क्रमांक पटकवला असून ज्योतिका रवींद्र नीलगार ( सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर) हिने द्वितीय क्रमांक पटकवला, तर प्रदीप भंडारी (ठाकूर पॉलिटेक्निक, मुंबई) याने तृतीय क्रमांक पटकवले आहे.
ऑनलाईन क्विज स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा व प्राचार्य गजानन धरणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. शिल्पा देशमुख, प्रा. स्वयंम व्यास, प्रा. अमृता थोकडे, प्रा. प्रमिला वाले, प्रा. शुभांगी माशाकर, प्रा. मधू गुडगुंटी, रोहित देशपांडे, कु. वैशाली बायस यांनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले.
#solapurcitynews