skill-development-solution
Solapur City Maharashtra

कौशल्य विकास हाच बेरोजगारीवर उपाय : आ.सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – सुशिक्षित किंवा अल्पशिक्षित बेरोजगारांना लहान मोठ्या उद्योगांचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे हाच त्यांच्यातल्या बेरोजगारीवरचा उपाय आहे. अशा बेरोजगारांना  हव्या असणार्‍या उद्योगात कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण घेता यावे यासाठी लोकमंगल प्रयत्न करेल असे प्रतिपादन लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाषबापू देशमुख यांनी ऑन लाईन चर्चासत्रात बोलताना केले.
                         कसलेही कौशल्य ना जाणणार्‍या बेरोजगार तरुणांसाठी काय करता येईल आणि त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या सोयी करता येतील यावर विचार करण्यासाठी काही उद्योजकता मार्गदर्शकांचे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात आमदार सुभाष देशमुख यांनी, असे अनेक तरुण आपल्याला भेटतात आणि त्यांची क्षमता वाया जात असल्याचे पाहून हळहळ वाटते, असे सांगितले.
या चर्चासत्रात डॉ. अभिजित जगताप, गणेश शिंदे, संजय हाजगुडे, मृणालिनी मोरे, अमित खांडेकर, विशाल गायकवाड, शोभा बोल्ली, रोहन येडगे, शुभम सूळ, यशवंत बिराजदार यांनी सहभाग नोंदवून आपली मते मांडली. बर्‍याच युवक युवतींना आपल्यात किती क्षमता आहे आणि आपल्या हातात कोणते कौशल्य आहे याचीच जाणीव नसते पण  त्यांना त्याची जाणीव करून दिली तर ते त्याच कौशल्यातून आपला स्वत:चा रोजगार निर्माण करून आणखी एक दोघांचा रोजगार निर्माण करू शकतील, असे मत या सर्व तज्ञांनी व्यक्त केले. ज्या युवकांत कसलेही अंगभूत कौशल्य नसेल त्यांना काही कौशल्ये शिकवून कामाला लावता येते. मात्र त्यासाठी त्यांना कारखान्यात किंवा उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागेल. तशी सोय लोकमंगल कडून उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा सुभाष बापूंनी केली. या जगात हजारो उद्योग संधी आहेत पण, त्यांंची माहिती लोकांना नाही ती त्यांना दिली पाहिजे असे ते म्हणाले.  कार्यक्रमाचे संचालन आणि समारोप अरविंद जोशी यांनी केला. नव्याने स्वयंरोजगार करणार्‍या तरुणांनी शक्यतो भांडवल लागणार नाही अशा सेवा उद्योगापासून सुरूवात करावी तसेच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, प्रवास अशा मूलभूत गरजांशी संबंधित व्यवसाय करावा असे त्यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143